HW News Marathi
महाराष्ट्र

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसलेंना ईडीचे समन्स

पुणे | पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ईडीने समन्स बजावले आहे. आज ( १ जुलै) त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अविनाश भोसलेंना समन्स बजावले आहे. भोसले आता ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अविनाश भोसलेंच्या मुलाचीही होणार चौकशी

अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यालाही ईडीने समन्स बजावले आहे. अमित भोसलेला उद्या (२ जुलै) चौकशीला हजर राहण्याचे आदेश आहेत. पुण्यातील एका जमिनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केलं आहे. ही जमीन सरकारी असल्यामुळे याबाबत पुण्यात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हायकोर्टाकडून दिलासा नाही

ईडीने गुन्हा रद्द करावा यासाठी अविनाश भोसले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावर हायकोर्टानेही अविनाश भोसले यांना चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई हायकोर्टाकडून कोणतीही सवलत न मिळाल्याने अविनाश भोसले यांना ईडीच्या चौकशीला समोर जावं लागत आहे.

४० कोटींची मालमत्ता जप्त

अविनाश भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“इंटर्व्हलनंतरची स्टोरी मी सांगतो”, NCB प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा

News Desk

जेईई आणि नीट परीक्षेच्या विद्यार्थाना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला दिलासा 

News Desk

आर्यन खानचा एनसीबी कोठडीमधील मुक्काम दोन दिवसांनी वाढला

News Desk