HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजी ब्रिगेड कडून थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या बंगल्यासमोर ठिय्या…!

मुंबई।मराठा आरक्षणावरुन राज्यात चांगलंच वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलेल आहे. मराठा समाजाने आता यासंदर्भात आता आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. आदित्य ठाकरे यांनी भेटीची वेळ न दिल्यानं संतापलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी लागलीच आदित्य ठाकरेंच्या शासकीय बंगल्याच्या दिशेनं मोर्चा वळवला आणि बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न देखील केला मात्र आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत मराठा समाज तसेच ओबीसी आरक्षणाला संरक्षण द्या अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

संभाजी ब्रिगेड च्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करण्यात आली त्या मागण्या म्हणजेच, ओबीसी आरक्षण, मराठा समाजाला संरक्षण द्यावे. सुप्रीम कोर्टाच्या निकालापुर्वीच या मराठा समाजातील नोकरीस पात्र उमेदवारांचा रखडवलेल्या नियुक्त्या तात्काळ द्यावात. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तात्काळ माफ करावे. सर्व समाज घटकांची जातनिहाय जनगणना करावी. मराठा समजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे अशा मागण्या संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आल्या.

तर पर्यावरण मंत्र्यांकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भेटीची वेळ मागितली होती. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भेट मागितली असल्याचं समजतये मात्र, आदित्य ठाकरे यांनी भेट दिली नाही. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्रालया जवळ असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या शासकिय बंगल्यासमोर जोरदार आंदोलन केल, आणि कार्यकर्त्यांनी बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलन करत मोठ्याने घोषणाबाजी केली. यावेळी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात काल नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली, राज्यात काल 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

News Desk

महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांचा राजीनामा

News Desk

Sheena Bora Case : साडेसहा वर्षापासून तुरुंगात असलेली इंद्राणी मुखर्जी अखेर बाहेर

Aprna