HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नेत्यांचं राज्यपालांनी ऐकलं, अधिवेशनासंदर्भात थेट मुख्यमंत्र्याना लिहीलं पत्र!

मुंबई | कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी ५ व ६ जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. यावरुन राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने टीका केली होती. २ दिवसांच्याच अधिवेशनाच्या कालावधीवरुन त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. तसेच, भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना पत्र दिलं होतं. ज्यात अधिवेशनाचा कालावधी वाढवावा याची मागणी केली होती. यानंतर आता थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार? अधिवेशनाचा कालावधी वाढवणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

राज्यपालांच्या ३ मागण्या कोणत्या?

१- विधानमंडळाचे अधिवेशन अधिक कालावधीसाठी घेणे

२- विधानसभा अध्यक्ष्यांचे संविधानिक पद तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याबाबत आणि

३- राज्यातील ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्यामुळे, स्थिनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सद्यस्थितीत न घेण्याबाबत

विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात पावसाळी अधिवेशनाची बैठक झाली होती. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, मंत्रीमंडळातील सदस्य, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

कोरोना चाचणी होणार

बैठकीत पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजासंदर्भातील तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.यासाठी विधानभवन, मुंबई येथे शनिवार व रविवारी दि. 3 व 4 जुलै, 2021 रोजी RT-PCR कोरोना चाचणीसंदर्भात व्यवस्था करण्यात येणार आहे.

तसेच गर्दी होवू नये यासाठी विधानमंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षा रक्षक यांची बसण्याची व्यवस्था बाहेरील तंबूमध्ये करण्यात येणार आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच अधिवेशन कालावधीत खासगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाही. याचबरोबर मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांना देखील मर्यादित स्वरुपात प्रवेश देण्यात येणार आहे.

सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार

सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये सदस्यांकरिता एका आसनावर एक सदस्य अशा प्रकारे व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्ये देखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सदस्यांना एक किट देण्यात येणार असून त्यामध्ये एक फेस शिल्ड, मास्क, हॅडग्लोव्हज, हँड सॅनिटायझेशनची बॉटल देण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

News Desk

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

प्रवीण दरेकरांना दिलासा, सोमवारपर्यंत अटक न करण्याचे सत्र न्यायालयाचे निर्देश

Aprna