HW News Marathi
महाराष्ट्र

अभिनेत्री मंदिरा बेदीवर दु:खाचा डोंगर कोसळला, पती राज कौशल यांचे झालं निधन

मुंबई | बॉलिवडू अभिनेत्री मंदिरा बेदी हिच्या पतीचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कारकिर्दीत त्यांनी तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन राज कौशल यांनी केले आहे. तर माय ब्रदर निखिल, शादी का लड्डू आणि प्यार में कभी-कभी या सिनेमांची निर्मितीही त्यांचीच होती. राज कौशल यांच्या निधनाने बॉलिवूडमधील दिग्गजांनीही शोक व्यक्त केला आहे.

मंदिरा बेदीसोबत विवाह

1999 मध्ये अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचा विवाह झाला होता. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. 2011 मध्ये त्यांचा मुलगा वीर कौशलचा जन्म झाला. तर गेल्याच वर्षी त्यांनी चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. तिचं तारा बेदी कौशल असं नामकरण करण्यात आलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी कर्मचाऱ्यांवर चर्चा करण्यासाठी परब थेट पवारांच्या भेटीला

News Desk

“बैलगाडी शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल” – जयंत पाटील

News Desk

महाविकासआघाडी सरकार तीन चाकी, मात्र स्टेअरिंग माझ्याच हातात !

News Desk