HW News Marathi
व्हिडीओ

अटक टाळण्यासाठी अनिल देशमुखांची ईडीला दांडी? वयं,आजारपणाचं कारण…

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज (मंगळवार,२९ जून) सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार होती. त्यासाठी सकाळी ११ वाजता त्यांना कार्यालयात हजर राहण्याचे समन्स देखील बजाविण्यात आले होते. मात्र अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे.

#AnilDeshmukh #ED #SharadPawar #BJP #Mumbai #NarendraModi #Arrest

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांनी Chandrakant Patil यांच्यावर सव्वा रूपयाचा दावा लावणार असं सांगितल आहे

News Desk

#RamMandir : अयोध्या राम मंदिरासाठी शिवसेनेची महाआरती

News Desk

Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त ‘Matoshree’वर शुभेच्छांचा वर्षाव

Chetan Kirdat