नवी दिल्ली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आठ मदत योजनांची घोषणा केली आहे. या आठ घोषणापैकी चार घोषणा नव्या आहेत. अर्थमंत्र्यांनी सर्वात आधी हेल्थ सेक्टरशी संबंधित एका नव्या मदत योजनेच्या पॅकेजची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी कोविड प्रभावित सेक्टरसाठी १.१लाख कोटी लोन गॅरेंटी स्कीमची घोषणा केली आहे. कोरोना संकटामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी कोविड -१९ मुळे प्रभावित क्षेत्रांसाठी १.१ लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेज अंतर्गत आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ५०००० कोटी आणि इतर क्षेत्रांसाठी ६०००० कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थव्यवस्थेला बुस्ट देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आरोग्य क्षेत्राला मजबूत करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. याकरीता अर्थमंत्र्यांनी ५० हजार कोटी जारी केले आहे. कोरोना प्रभावित क्षेत्रांना १.१ लाख कोटी कर्जाची गॅरंटीची घोषणा केली आहे.
इमर्जन्सी क्रेडिट लाईन योजना!
मागच्या वेळी जाहीर करण्यात आलेल्या ३ लाख कोटींच्या इमर्जन्सी क्रेडिट लाईन योजनेच्या रकमेमध्ये अजून दीड लाख कोटींची भर यावेळी घालण्यात आली आहे. यासंदर्भात विभागनिहाय निधी वितरणाची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल. गेल्या वेळी यासाठी ३ लाख कोटींची घोषणा करण्यात आली होती. त्यातल्या २ लाख ६९ कोटींचं वितरण व्यापारी, उद्योग, बँक, आणि इतर कंपन्यांना करण्यात आलं. याची मर्यादा आता ४.५ लाख कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थात अतिरिक्त दीड लाख कोटींची वाढ करण्यात आली आहे. २३, २२० कोटी रुपयांची घोषणा लहान मुलांसाठीच्या आरोग्य सुविधेसंदर्भातल्या (बालरोग) कामांसाठी या वर्षी ही रक्कम खर्च करण्यात येईल. ३१ मार्च २०२२ पर्यंत ही रक्कम उपलब्ध करून दिली जाईल.
The financial expenditure on the free distribution of ration to poor people this year will be Rs 93,869 crores. The total money spent on Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana will be Rs 2,27,841 crores: MoS Finance Anurag Thakur pic.twitter.com/Q4PjCDNB15
— ANI (@ANI) June 28, 2021
पर्यटन विभाग
पर्यटन क्षेत्र भारतासाठी अतिशय महत्त्वाचं असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. हे क्षेत्र रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करतं. आर्थिक मदत टूरिस्ट गाईड्स आणि इतर स्टेक होल्डर्ससाठी केली गेली आहे. यामुळे कार्यरत भांडवल उपलब्ध होईल. वैयक्तिक कर्ज, तसंच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही याचा लाभ होईल. १०० टक्के गॅरेंटी सरकारकडून दिली जाईल. १० लाख रुपये प्रति एजेन्सीपर्यंत दिले जातील. तर लायसेंस्ड टूरिस्ट गाईडला १ लाख रुपये दिले जातील. यात कोणताही प्रोसेसिंग चार्ज किंवा क्लोजर चार्ज द्यावा लागणार नाही.
Atmanirbhar Bharat Rozgar Yojana has now been extended from June 30, 2021, to March 31, 2022. Over 21.4 lakh people of nearly 80,000 establishments have already benefited from the scheme: Finance Minister pic.twitter.com/0DEjIkTU7N
— ANI (@ANI) June 28, 2021
आरोग्य क्षेत्राला पाठबळ
कोविड प्रभावित क्षेत्रांसाठी १ लाख १0 हजार कोटींच्या क्रेडिट गॅरंटी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्यापैकी करोना काळात आव्हान निर्माण झालेल्या आरोग्य क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा केली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. या निधीचा वापर आरोग्यविषयक सुविधांच्या उभारणीसाठी होणार. याव्यतिरिक्त इतर विभागांसाठी ६० हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे.
To revive tourism, the new loan guarantee scheme will support 10,700 regional level tourist guides and Travel & Tourism stakeholders (TTS) recognized by the Ministry of Tourism and the State governments: Finance Minister Nirmala Sitharaman pic.twitter.com/EohsxQ6Kd7
— ANI (@ANI) June 28, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.