HW News Marathi
Covid-19

सरकारशी चर्चा सुरु, मात्र आंदोलन मागे घेणार नाही ! । संभाजीराजे

मुंबई । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. याच मुद्दयावर आज (१७ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यात मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. संभाजीराजे छत्रपती यांनी या बैठकीनंतर एक पत्रकार परिषद घेऊन या बैठकीविषयी माहिती दिली. “सरकारशी चर्चा सुरु आहे. मात्र, मराठा समाजाचे मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही”, असे संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजे या पत्रकार परिषदेत म्हणाले की, “नाशिकला सर्व समन्वयकांशी चर्चा करुन पुढची दिशा ठरवली जाईल. सरकारशी देखील चर्चा सुरु आहे. मात्र, मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.”दरम्यान, ही महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर संभाजीराजेंप्रमाणेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या निकालाबाबत राज्य सरकार येत्या आठवड्याभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

संभाजीराजे यावेळी म्हणाले की, कोल्हापूरमध्ये सुरु झालेलं मूक आंदोलन सुरुच राहणार आहे. हे आंदोलन 36 जिल्ह्यांमध्ये घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. तर सरकार गुरुवारी (२४ जून) रिव्ह्यू पिटीशन दाखल करणार आहे. “माझी अपेक्षा आहे की सारथीच्या चेअरमननी पैशाची मागणी करावी. सरकारनं लागेल तेवढा पैसा देण्याची तयारी दर्शवली आहे”, असेही संभाजीराजे म्हणाले. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात एक समिती देखील स्थापन केली जाणार असल्याचंही संभाजीराजे म्हणाले.

राज्य सरकारसोबतच्या आजच्या बैठकीत २०१४ पासूनच्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न, मराठा आरक्षण आंदोलनातील १ गुन्हा वगळता इतर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाल्याचंही संभाजीराजेंनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना २४ तासांत ३ वेळा फोन, राज्यात ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती चिंताजनक!

News Desk

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास खा डार्क चॉकलेट, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिला सल्ला

News Desk

राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

News Desk