HW News Marathi
महाराष्ट्र

करुणा शर्मा यांच्या जामिनावर आज सुनावणी!

बीड। जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या करुणा शर्मा यांच्या जामिनावर मंगळवारी (14 सप्टेंबर) न्यायालयात सुनावणी होणार आहे. अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी होईल. यावेळी न्यायालय करुणा शर्मा यांना जामीन देणार की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

6 सप्टेंबरला पोलिसांनी करुणा शर्मा यांना न्यायालयात हजर केले होते

करुणा शर्मा बीडमध्ये असताना त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. 6 सप्टेंबरला पोलिसांनी करुणा शर्मा यांना न्यायालयात हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने करुणा शर्मा यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

नेमकं काय घडलं?

शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होत.

व्हायरल व्हिडीओत काय?

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

करुणा शर्मांची तक्रार

परळीत आल्यानंतर आपल्या अंगावर जमाव धावून आला होता, अशी तक्रार शर्मा यांनी परळी शहर पोलिसात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी 70 ते 80 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर जमावाने त्यांची गाडी रोखली होती. काही क्षण ही गाडी थांबल्यानंतर त्या परत निघून गेल्या होत्या.

भीमसैनिकांची घोषणाबाजी

दरम्यान, आंबाजोगाई कोर्टाबाहेर भीमसैनिकांनी शर्मा यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. शर्मा या शहरातून आल्या आहेत. त्या परळीत कुणाला ओळखत नाहीत. कोण कोणत्या जातीचा आहे हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे त्या कुणाला जातीवाचक शिवीगाळ कशा देतील? दलित समाजाला पुढे करून शर्मा यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलं असून हे चुकीचं आहे. दलित समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून अॅट्रोसिटी कायद्याचाही गैरवापर असल्याचं भीमसैनिकांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तीन महिन्यांसाठी वीज तोडणी तात्पुरती थांबवली; नितीन राऊतांची विधानसभेत घोषणा

Aprna

गृहमंत्रीपद स्विकारताचं दिलीप वळसे-पाटील यांचा मोठा निर्णय…

News Desk

कोविडविरुद्ध लढ्यासाठी ‘मुंबई मॉडेल’ ची यशोगाथा जगासमोर! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Aprna