HW News Marathi
महाराष्ट्र

“१९ महिने काय तुम्ही झोपा काढत होता का?” चंद्रकांत पाटलांचा पलटवार!

पुणे | भाजप नेते किरीट सोमैया यांनी आज(१३ सप्टेंबर) राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात १२७ कोटी रुपयांचा घोटाळा जाहीर केला आहे. त्यावर आता राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे. मात्र, त्याचवेळी हसन मुश्रीफ यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील टीका केली. त्यावरून आता चंद्राकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला आहे. “माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ साहेबांना झोप लागत नाही. ते आमचे चांगले मित्र आहेत. आपल्या मित्राला आपलं नाव घेतल्यानंतर चांगली झोप लागत असेल, तर मित्रासाठी त्याला माझी हरकत नाही”, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे.

पैसा स्वत: भरणार की वर्गणी काढणार

चंद्रकांत पाटील यांनी थेट हसन मुश्रीफ यांच्यावर हल्ला केला आहे. “हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय की किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा दावा ठोकणार. पण ही त्यांची कार्यपद्धती आहे. अलिकडच्या काळात इतके घोटाळे समोर येतात, की १०० कोटींचा दावा ही फार छोटी रक्कम आहे. त्यांनी जरा ५००, १००० कोटी रुपयांचा दावा ठोकला पाहिजे. शिवाय अब्रू नुकसानीचा दावा करायला कोर्टात स्टॅम्पसाठी विशिष्ट रक्कम भरावी लागते. तेवढे व्हाईट पैसे आहेत का हे पाहावं. कारण ब्लॅक मनी तिथे चालत नाही. मग हा पैसा स्वत: भरणार की वर्गणी काढणार, हेही त्यांनी सांगावं”, असं पाटील म्हणाले आहेत.

सेल, तर घाबरण्याचं काय कारण?

“महाराष्ट्रात आम्ही हॅम नावाचा ऐतिहासिक प्रकल्प केला, ज्याच्या रस्त्यांचं काम पूर्ण झाल्याचे कार्यक्रम हे करत फिरत आहेत. त्या हॅममध्ये घोटाळा आहे असं जर मुश्रीफांचं म्हणणं आहे, तर १९ महिने काय तुम्ही झोपा काढत होतात का? आत्ता तुम्हाला जाग आली का? त्यांना हॅमविषयी तक्रार करायची असेल, तर काही अडचण नाही. १९ महिन्यांत करण्यासारखं खूप होतं. कोविडमध्ये पैसे खाण्याशिवाय दुसरं काम नव्हतं. त्या काळात हे करता आलं असतं”, असं देखील पाटील म्हणाले. मी धमक्यांना घाबरत नाही. तुमची काही चूकच नसेल, तर घाबरण्याचं काय कारण? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

25 टक्क्याची स्टॅम्प ड्युटी लागते, तेवढा व्हाईट मनी आहे का?

हॅब्रीड अॅन्यूईटी मध्ये ३० हजार कोटीची कामं निघाली. सरकारकडे पैसे नसल्यामुळे दोन वर्ष 60 टक्के आणि 40 टक्के अशी ती कामं होती, त्याचं टेंडर निघालं, काम पूर्ण होत आहेत. हॅब्रीड अॅन्यूईटीमध्ये जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झालेत. ती मग थांबवायला हवी होती, का थांबवली नाहीत? मुश्रीफांच्या आरोपांमध्ये बूड असेल तर माझ्यावर कारवाई होईल, मी काय घाबरत नाही. मी जसं म्हटलं, मी घाबरत नाही, त्यांनीही म्हणावं. कितीही कोटीचा दावा केला तरी दावा करण्यासाठी 25 टक्क्याची स्टॅम्प ड्युटी लागते, तेवढा व्हाईट मनी आहे का? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

मी कशाला घाबरत नाही

माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. माझं नाव घेऊन त्यांना झोप लागत असेल तर बरं आहे. ते नेहमी 100 कोटीच्या दाव्याच्या बाता करतात, त्यापेक्षा जास्त दावा ठोका. त्यांचं सरकार येऊन 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला. त्यांना कुणी रोखलंय? माझ्यावर खुशाल तक्रार करा, कुठेही करा. मी कशाला घाबरत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले…

Aprna

सण-वार काही काळ बाजूला ठेवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं गोविंदा पथकांना आवाहन!

News Desk

महिला सक्षमीकरणास प्राधान्य! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna