HW News Marathi
महाराष्ट्र

OBC आरक्षणासाठी भाजपचा राज्यभरात एल्गार; फडणवीसांना पोलिसांनी घेतलं ताब्यात !

नागपूर। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मध्ये सकाळपासून चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली होती, त्यानंतर बीडमधून प्रीतम मुंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रवीण दरेकर आणि त्यापाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरणात चांगली अस्थिरता निर्माण झाल्याच पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात १ हजार ठिकाणी भाजपकडून २६ जून अर्थात आज शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. तर भाजपच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर आता काँग्रेसनंही २६ जून रोजी आंदोलनाची घोषणा केली. काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषित केलंय.

महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतलं तसंच कार्यकर्त्यांचीही धरपकड केली.

फडणवीसांना घेतलं ताब्यात

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली तसेच, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं, असा आरोप त्यांनी केला. सरकारला येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्यायच्यात, असा आरोपही त्यांनी केली. आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना

ताब्यात घेतलं.

चंद्रकांत पाटलांचा एल्गार

संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन होत आहे. ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारमुळे गेलं. सरकारचा नाकर्तेपणा आता जनतेसमोर आलाय. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे. जो पर्यंत महाराष्ट्र सरकार डाटा गोळा करणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आंदोलनानंतर पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

जयंत पाटलांची टिका

भाजपचे आजचे आंदोलन म्हणजे, ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ अस ट्वीट करत जयंत पाटील यांनी आज चालू असलेल्या चक्का जाम आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.जयंत पाटील म्हणाले की, राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यावेतन वाढीसाठी राज्यात डॉक्टरांचा संप

News Desk

माझी पत्नी आरएसएसमध्ये कधी गेली ?

News Desk

घरोघरी राष्ट्रवादीची घडी!, परळी शहारत प्रत्येक रविवारी धनंजय मुंडे मतदात्यांच्या दारी

News Desk