HW News Marathi
महाराष्ट्र

किरीट सोमय्या सोमवारी बॉम्ब टाकणार; ते दोन नेते कोण? तर्कवितर्कांना उधाण!

मुंबई। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री आपल्या रडारवर असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. येत्या सोमवारी या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. मात्र, त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावं गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे हे दोन नेते कोण? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे

किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला आहे. माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात 24 हजार पाने आहेत. त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा जो गठ्ठा आहे त्यात चार हजार पानं आहेत. तो शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस दिल्लीत चर्चा करणार आहेत. त्यांनी मला सूट दिलेली आहे. सोमवारी हे नाव उघड करणार आहे. तुम्ही चांगले काम करता. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असं फडणवीसांनी मला सांगितलं आहे. त्यामुळे मला सुरक्षा मिळालेली आहे आणि मला सर्व अधिकार आहेत, असं सोमय्या यांनी सांगितलं.

उत्तर आणि प्रत्युत्तर द्यायला हा काय मुशायरा नाहीये

यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही घेरलं. उत्तर आणि प्रत्युत्तर द्यायला हा काय मुशायरा नाहीये. ठाकरे सरकार आणि आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्राची वाट लावली. त्यामुळे घोटाळेबाज मंत्र्यांना शिक्षा व्हावी हा उद्देश आहे. एखादा कुठला तरी निकाल आला की काही मंत्र्यांना चार दिन की चांदनी असं वाटतं.

त्याचा आनंद थोडा दिवस घेऊ द्या

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार हे सेटिंगबाजांचं सरकार आहे. बेनामी संपत्ती होती त्यात भुजबळ राहत होते. आताही राहतात हा बंगला कोणाचा आहे? मी म्हणालो ना, चार दिन की चांदनी आहे. त्याचा आनंद थोडा दिवस घेऊ द्या. गेली पाच वर्ष जे त्यांनी सहन केलंय त्यामुळे ते आनंद व्यक्त करत असतील. मला शेरोशायरीत जायचं नाही. कारण ही लूट आहे. मंत्री आणि सरकार शेरोशायरी करत असतील पण सोमय्या महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला जबाबदार आहे. त्यामुळे भुजबळांचे 120 कोटींची चोरी आम्ही पकडून दिली, असं सांगतानाच शेरोशायरी नाही, 120 कोटी कुठून आले ते सांगा? असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे 

News Desk

नारायण राणे थेट उच्च न्यायालयात जाणार!

News Desk

अखेर कालीदास कोळंबकर यांचा काँग्रेसच्या पदाचा राजीनामा

News Desk