HW News Marathi
Covid-19

देशात आढळला कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट, महाराष्ट्रात आढळले २१ रुग्ण

नवी दिल्ली। संपूर्ण राज्यासह देशात कोरोना या संसर्गाची रुग्ण आता कमी होतायेत यातच पुन्हा एक नवं संकट निर्माण झाले, डेल्टा प्लस बाबत चिंता सतावू लागली आहे. डेल्टा प्लस या घटनांमध्ये देखील वाढ झाल्याचं दिसून आलंय, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आत्तापर्यंत एकूण ४० प्रकरणांची नोंद झाली. तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, आणि मध्य प्रदेश ही राज्य आहेत.

तर याआधी सरकारने माहिती दिली होती की , भारतात कोरोना व्हायरसची डेल्टा प्लस व्हेरिएंटची २२ प्रकरणे सापडली आहेत . त्यापैकी १६ प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत . इतर प्रकरणे मध्य प्रदेश आणि केरळमध्ये नोंदवली आहेत . केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले होते की , आतापर्यंत ज्या दहा देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे . त्यापैकी भारत एक आहे . तर ८० देशांमध्ये ‘ डेल्टा व्हेरिएंट ‘ आढळला आहे .

दरम्यान , देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार असलेला डेल्टा व्हेरिएंट सध्या भारतसह जगातील ८० देशांमध्ये आहे . तर डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतासह १० देशांमध्ये आहे . कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट अमेरिका , ब्रिटन , पोर्तुगाल , स्वित्झर्लंड , जपान , पोलंड , नेपाळ , चीन , रशियासह भारतात सापडला आहे .

*राजेश टोपे यांची माहिती*

डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण अधिक गंभीर होतात मात्र, तरीही घाबरण्याचे कारण नाहीये, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचे एकूण २१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७ मुंबई, २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, असं टोपेंनी सांगितलं.

डेल्टाला डेल्टा प्लस पूर्ण बदल झालेला नाही. आता सॅम्पल सापडले त्यात पेंशट सीरिअस होण्याचे प्रमाण जास्त आहे तरी ही घाबरवण्याचे काम नाहीये. ज्या ठिकाणी डेल्टा प्लस विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत तेथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सांगितलं आहे, असं राजेश टोपे म्हणाले. तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने तयारी केली आहे. वैद्यकीय स्तरावर, लहान मुलं यासाठी आयसीयू तयार केले जात आहेत. ऑक्सिजन ३ हजार मेट्रिक टन उपलब्ध करण्याबाबत राज्य शासन प्रयत्न करत आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरात आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण!

News Desk

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सुरुवात गुजरातपासून !

News Desk

Sion Hospital : मुंबईचा वाली कोण ? ही वैद्यकीय आणीबाणी ? राणे-फडणवीसांचा सवाल

News Desk