HW News Marathi
Covid-19

“मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात, मग दिल्लीत १५ एकरांच्या घराचा उपद्व्याप का ?”

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदी हे स्वत:ला फकीर म्हणवतात. मग दिल्लीत १५ एकरांचे घर बांधण्याचा हा उपद्व्याप कशासाठी चालवला आहे?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ‘सामना’तील आपल्या रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांवर निशाणा साधताना संजय राऊत यांनी मोदींवरही टीका केली आहे.

संजय राऊत म्हणतात, “ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कोरोना काळात वेळ जात नसावा म्हणून तिसरे लग्न केले. तिथला कोरोना आता लवकर नियंत्रणात आला नाही तर जॉन्सनसाहेब वेळ घालविण्यासाठी आणखी चौथ्यांदा आणि पाचव्यांदाही बोहल्यावर चढतील. तर आपल्याकडे दिल्लीत कोरोना काळात नवे संसद भवन, पंतप्रधानांसाठी १५ एकरात नवे घर, नवे उपराष्ट्रपती निवास उभे राहत आहे. पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात खरे. पण हा सगळा उपद्व्याप फकिरीत गणला जात नाही”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

“केंद्र सरकार मेहुल चोक्सी आणि पश्चिम बंगालमधील राजकीय खेळांच्या माध्यमातून केवळ वेळकाढूपणा करत आहे. आता ऑण्टिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी चोक्सीला भारताच्या हवाली केले तर नव्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात ब्राऊन यांचा पुतळा नक्कीच उभारला जाईल. काय सांगावे ! कदाचित २०२२ प्रजासत्ताक दिनी ते सन्माननीय पाहुणेही असतील. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी मिस्टर ब्राऊन यांना ‘भारतरत्न’ही दिले जाईल”, असाही टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रसिद्ध टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण

News Desk

सिरम इन्स्टिट्यूटच्या मानवी चाचणी दरम्यान मेंदुरवर परिणाम झाल्याचा स्वयंसेवकाचा आरोप

News Desk

आता परप्रांतीयांकडून मेडिकल सर्टिफिकेट नाही, प्रवासाआधी होणार विनाशुल्क मेडिकल चेकअप

News Desk