HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील एखादं आसन सुचवा, अतुल भातकळकरांचा टोला

मुंबई | आज (२१ जून) जगभर आंतराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय. आपल्या जीवनात योगाच महत्व किती आहे हे आपण सारेच जाणून आहोत. याबाबतीत अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र राजकीय वर्तुळात याचाच धागा पकडत टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त भाजपला कोणतं आसन सूचवाल?, असा सवाल संजय राऊतांना करण्यात आला होता. यावर राऊतांनी भाजपने ‘शवासन’ करावं, असं म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने अखंड धगधगतायत. मेंदू तल्लख करणारे आणि कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन त्यांना सुचवा अर्थात घरी बसून करता येईल असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. त्यासोबतच लॉकडॉनवरूनही मुख्यमंत्र्यांवर चांगलीच सडकून टिका केलीये.

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लॉकडाऊनच्या हट्टाची किंमत शेतकऱ्यांनी का भोगायची?, भावच नाही म्हणून जुन्नरच्या शेतकऱ्याने केळीची उभी बाग शेळ्या-मेंढ्यांना चरायला दिली. निवडणुकीपूर्वी बांधावर जाऊन केलेल्या शेतकरी हिताच्या गोष्टी हवेत उडल्या काय?, असा सवाल भातखळकरांनी केला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने आता शवासन करावं, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे राऊतांच्या टीकेला भाजप काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर हा हल्ला चढवला. आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. त्यामुळे भाजपसाठी तुम्ही कोणतं आसन सूचवाल?, असा सवाल मीडियाने राऊतांना केला. त्यावर ‘शवासन’ असं राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली जिल्ह्यातील बाबरवस्ती शाळा आदर्श पुरस्काराने सन्मानित

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय

Aprna

आणि…आम्ही तीन होणार ! विरुष्काच्या घरी येणार छोटा पाहुणा

News Desk