पुणे | पुण्यात गणेशोत्सवानिमित्त जमावबंदी केली आहे, अशी बातमी सगळीकडे पसरत होती, मात्र ही एक अफवा असल्याचं समोर आलं आहे. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे गणेशोत्सव साधा पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात पुण्यात संचारबंदी किंवा जमावबंदी नसेल, असं पोलिस सहाय्यक आयुक्त डॉ. रविंद्र सिसवे यांनी सांगितलं आहे. मागील वर्षी होती तिच आचारसंहिता यंदाही पुण्यात लागू असेल असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
भक्तांना ऑनलाईन माध्यमातून दर्शन
कोरोनाची तिसऱ्या लाटेचा धोका अजून दर्शवला जात आहे. दरम्यान पुण्यातील गणपती मंडळांनी नागरिकांना, भक्तांना ऑनलाईन माध्यमातून दर्शन व आरती घेण्याचे आवाहन केले होते. त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेऊन उत्सव साजरा करण्याचे आणि ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केलं आहे.
1)मानाचा पहिला श्री कसबा गणपती
2)मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
3)मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती
4) मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती
5) मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती
तसंच प्रमुख गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती, अखिल मंडई मंडळ या मंडळांनी एकत्रित येऊन पुणेकरांना ऑनलाईन दर्शनाचं आवाहन केलं आहे.
मुंबईत ऐन गणेशोत्सवात जमावबंदीचा आदेश
मुंबई पोलिसांनी पुढील 9 दिवस कलम 144 लागू केलं आहे. त्यामुळे आता मुंबईत पुढील 9 दिवस सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जण्यास परवानगी नाही. मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता गणेशोत्सवात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नसेल. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध असल्याने, नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. भाविकांना आता ऑनलाईनच दर्शन घ्यावे लागणार आहे.
राज्य सरकारचा नेमका निर्णय काय?
राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.