HW News Marathi
महाराष्ट्र

माजी मंत्री एकनाथ खडसे दोषी! कायदेतज्ञ असीम सरोदेंचा दावा!

मुंबई। भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी घोटाळा प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सक्तवसुली संचालनालयाकडून देखील या प्रकरणाचा तपास सुरु आहे. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी आपलं मत मांडलं आहे. “खडसे यांच्या प्रकरणात भ्रष्टाचाराशी संबंधित घटक अगदी स्पष्टपणे दिसतात. हे मनी लॉन्ड्रींगचं प्रकरण आहे. याकरिता खडसेंनी आपल्या पदाचा देखील गैरवापर केला असून प्रथमदर्शनी एकनाथ खडसे या प्रकरणात दोषी आढळतात”, असं असीम सरोदे यांनी स्पष्ट केलं आहे.

भ्रष्टाचाराशी संबंधित घटक अगदी स्पष्टपणे दिसतात

वकील असीम सरोदे म्हणाले की, “एकनाथ खडसे यांच्या प्रकरणात भ्रष्टाचाराशी संबंधित घटक अगदी स्पष्टपणे दिसतात. कोणत्याही वकिलाने, कायदे तज्ञाने खडसेंच्या भोसरी जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रं पाहिली तर त्यांना पैसे कुठून आले? म्हणजेच त्यांचे जावई चौधरी आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या खात्यात जमा झालेले पैसे नेमके कुठून आले याचा प्रवास जर आपण पहिला तर स्पष्टपणे दिसतं की हे मनी लॉन्ड्रींगचं प्रकरण आहे. म्हणून, अन्य न्यायालयीन यंत्रणा आणि ED कडून खडसेंच्या चौकशी, तपास सुरु करण्यात आला आहे.

आपल्या सोयीसाठी काही शासकीय निर्णय फिरवणे

सूडाच्या हेतूने कोणावर तरी कायदेशीर प्रक्रिया करायची असं देखील व्हायला नको, असं मला वाटतं. परंतु, एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात मला हे नक्की दिसतं की, इथे मनी लॉन्ड्रींग झालेले आहे. पैशांची अफरातफर वा पैसे अनेक ठिकाणांहून आणून एका जागी जमा करणे, त्याचप्रमाणे एकनाथ खडसे यांनी आपण मंत्री असताना आपल्या पदाचा दुरुपयोग करणे, आपल्या सोयीसाठी काही शासकीय निर्णय फिरवणे या सगळ्या घडामोडी केलेल्या आहेत हे या प्रकरणात दिसतं.संपूर्ण प्रकरण पाहता एकनाथ खडसे हे प्रथमदर्शनी तरी दोषी आहेत, असं आपण म्हणू शकतो. मात्र, कायद्याच्या योग्य प्रक्रियेतून याबाबतचा निर्णय झाला पाहिजे”, असंही यावेळी असीम सरोदे यांनी स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी- ठाकरे भेट, चंद्रकांत पाटील-फडणवीस शकुनी डाव टाकणारच -अमोल मिटकरी 

News Desk

राज्यात बैठका सुरुच, महाविकासआघाडीची आज महत्वाची बैठक होणार!

News Desk

“…म्हणून आशिष शेलार यांनी मध्यावधी निवडणुकांचं भाकित केलं” – चंद्रकांत पाटील

News Desk