HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीत राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि शरद पवारांची भेट, राजकीय घडामोडींना वेग!

नवी दिल्ली | देशात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार काल (२० जून) दिल्लीला रवाना झाले आहेत. ३ दिवसांचा त्यांना दिल्ली दौरा असणार आहे. दरम्यान, या दौऱ्यात ते कोणत्या नेत्यांना भेटणार याची चर्चा सध्या सुरु आहे. अशात आज(२१ जून) राजकीय रणनितिकार प्पशांत किशोर दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. या आधी ११ जूनला शरद पवार यांच्या मुंबईच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी प्रशांत किशोर यांनी पवारांची भेट घेतली होती. या त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, मुंबईतील त्यांच्या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती होती असंही सांगण्यात आलं होतं. दरम्यान, आजच्या प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्या भेटीचा नेमका अर्थ काय आहे हे समजणं महत्वाचं आहे.

कितीही स्ट्रॅटेजी करा, 2024 मध्ये येणार तर मोदीच, पवार-प्रशांत किशोर भेटीवर फडणवीसांचं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात तब्बल साडे तीन तास बैठक झाली. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टोला हाणलाय. कुणी कितीही रणनिती आखा, पण आताही मोदी आहेत आणि 2024 लाही मोदीच असणार, अशा शब्दात फडणवीस यांनी पवार-किशोर भेटीवर प्रतिक्रिया दिली होती.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमध्ये 2024च्या लोकसभा निवडणुसाठी स्ट्रॅटेजी आखण्याबाबत चर्चा झाल्याची बोललं जात आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. मात्र, भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. त्याबाबत विचारलं असता फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं. कुणी कितीही रणनिती आखू द्या, आजही मोदी आहेत आणि 2024 लाही मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचीच सत्ता असेल, असा दावा फडणवीस यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ होणार ?

swarit

देशाच्या प्रत्येकाचा आम्हाला अभिमान-राष्ट्रपती रामनाथ कोविंद

News Desk

घडामोडींना वेग ! अजित पवार, जयंत पाटलांसह शरद पवारांची दिल्लीत तातडीची बैठक

News Desk