HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांवर गुन्हा दाखल करा ! पडळकरांची मागणी

पुणे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील शहर कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, याप्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. आता ही गर्दी करणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या अंगलट आली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह १०० ते १५० कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवणारी ठरु शकते. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. त्यानंतर आज जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्यालयाच्या उदघाटनाला कार्यकर्त्यांची झालेली गर्दी कोरोना नियमांची पायमल्ली करणारी होती. एवढ्या मोठ्याप्रमाणात गर्दी करण्याचा परवाना राष्ट्रवादीला देण्यात आला आहे का? असा प्रश्न उपस्थित करुन भाजप टीकेची झोड उठवली होती. झालेल्या प्रकारामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. ही गर्दी अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का देणारी ठरली. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, संयोजकांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी कालच्या गर्दीबाबत दिलगिरी व्यक्त केली. अशा पद्धतीनं गर्दी करायला नको होती, असं अजित पवार म्हणाले होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिंधुताई सपकाळ यांना महाराणी अहिल्याबाई होळकर नारीशक्ती पुरस्कार जाहीर

Gauri Tilekar

राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पुण्याच्या ‘आयएनएस शिवाजी’ संस्थेचा होणार सन्मान

swarit

लातूर, चंद्रपूर व परभणी मनपासाठी 19 एप्रिलला मतदान

News Desk