HW News Marathi
महाराष्ट्र

मोदींनी बाहेर बसवून ठेवल्याने अजित पवारांची मानसिकता बिघडलीय !

जळोची । “पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांना खोलीच्या बाहेर थांबवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यापासून पवार यांची मानसिकता बिघडल्या सारखी वाटते”, असा अत्यंत खोचक टोला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज (१९ जून) बारामतीत लगावला आहे पडळकर आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते व त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार ठीक ठिकाणी सांगत असतात. हाच धागा पकडून पडळकर यांनी पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, आटपाडी तालुक्यातून सांगली, सातारा जिल्हा सोडून ..।अवघ्या पंधरा दिवसाच्या तयारीने निवडणूक लढवली. अजित पवारांच्यात धमक असेल तर त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन स्थानिक नेत्यांचे पाठबळ नसताना निवडणूक लढवली तर तुमची ही अवस्था तीच होईल.

राज्यात विविध प्रश्न आहेत. मराठा आरक्षण का गेलं ? गायकवाड आयोगाचा अहवाल इंग्रजी मध्ये भाषांतरित का नाही केला ? तुमचेच वकील सांगतात की, राज्य सरकार कागदपत्र देत नाहीत. वेळोवेळी माहिती देत नाहीत. तसेच ओबीसीचे आरक्षण का संपलं ?पदोन्नतीतील आरक्षणाचा जी.आर कधी रद्द करणार? बीड मधील आरोग्य कर्मचारी आपल्या समस्या घेऊन पवार यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या विषयावर तुम्ही बोला. प्रश्न सोडून तुम्ही दुसरीकडे कशाला जाताय?, अशीही प्रश्नांची सरबत्ती यावेळी पडळकर यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार, कारण वाघाशी कधी दुश्मनी नव्हतीच!

News Desk

धर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

swarit

“इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR बंधनकारक!”

News Desk