HW News Marathi
Covid-19

लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही….! आरोग्य मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती

नवी दिल्ली। भारतात या कोरोना महामारीचा वेग आता मंदावत असल्याचं चित्र आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, 3 मे पासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून, सध्या बरे होण्याचं प्रमाण 96 टक्क्यापर्यंत पोहोचल आहे. याशिवाय अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही देखील आता घटायला सुरवात झाली आहे. 11 जून ते 17 जूनदरम्यान, 513 जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याच प्रमाण 5 टक्क्यांपेक्षाही कमी राहिल. याव्यतिरिक्त 24 तासात देशात 62,480 नवे रुग्ण सापडले. गेल्या 11 दिवसांपासून रुग्णसंख्या एक लाखांपेक्षा कमी झाल्याचं निदर्शनास आलय.

तर नीती आयोगाच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लस घेतलेल्या नागरिकांना जरी कोरोनाची लागण झाली, तरी त्यांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण हे 75-80 टक्क्यांपेक्षा कमी आहे. नव्या अहवालात ही बाब समोर आली आहे. लस घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजन देण्याची गरज केवळ 8 टक्के इतकी आहे. तर या रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्याचं प्रमाण केवळ 6 टक्के इतकं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची लागण अथवा मृत्यू झाल्यास पत्रकारांना ५० लाखांचे मिळणार विमा कवच !

News Desk

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी , महाराष्ट्रात ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यु

Arati More

#CoronaVirus : गेल्या २४ तासात महाराष्ट्रात १०८९ नवे कोरोना रुग्ण

News Desk