HW News Marathi
व्हिडीओ

भिजू नका रे ! अजित पवारांनी मुसळधार पावसामुळे नाकारलं ‘गार्ड ऑफ ऑनर’

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे आज मराठवाड्यातील बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची परिस्थिती आणि खरिपाच्या पेरणीबाबत आढावा घेण्यासाठी अजित पवार दोन्ही जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यावेळी उस्मानाबाद शहर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु होता. अशावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय अजितदादांचा ताफा पोहोचला असता त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पोलीस पुढे सरसावले. मात्र पावसात भिजणाऱ्या पोलिसांनी पाहून अजितदादांना गार्ड ऑफ ऑनर नाकारला आणि पोलिसांना भिजू नका असं सांगितलं.

#AjitPawar #RajeshTope #Osmanabad #Beed #Maharashtra #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pravin Darekar यांची Mumbai Bank च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

News Desk

PMC Bank | या सरकारमुळे आम्हांला ‘काळी दिवाळी’ करायची वेळ आली..

Arati More

Satej Patil,Hasan Mushrif,Balasaheb Thorat | कोल्हापुरला पालकमंत्रीचं मिळेना….! ‘हे’ नेते स्विकारणार का पालकत्व ?

Arati More