HW News Marathi
महाराष्ट्र

उस्मानाबादमध्ये अजित पवारांनी घडवलं माणुसकीच दर्शन

उस्मानाबाद । उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे आज मराठवाड्यातील बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचे आकडे कमी होताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची परिस्थिती आणि खरिपाच्या पेरणीबाबत आढावा घेण्यासाठी अजित पवार दोन्ही जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यावेळी उस्मानाबाद शहर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु होता. अजित पवारांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारा प्रसंग यावेशा घडला.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवारांचा ताफा पोहोचला असताना त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यासाठी पोलीस पुढे सरसावले. मात्र पावसात भिजणाऱ्या पोलिसांना पाहून अजितदादांनी गार्ड ऑफ ऑनर नाकारला आणि पोलिसांना भिजू नका असं सांगितलं.

अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे येत असल्यामुळे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तयारी केली होती. मात्र, अजित पवार राजेश टोपे दाखल झाले त्यावेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. अशावेळी पोलीस कर्मचारी मंत्रिमहोदयांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पुढे आले आणि अजित पवार यांनी गाडीतून उतरताच पोलिसांना भिजू नका असं सांगत गार्ड ऑफ ऑनर नाकारला. अजित पवार हे आपल्या कार्यशैली आणि रोखठोक बोलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आज उस्मानाबादमध्ये अजित पवारांनी दाखवलेली माणुसकीही चर्चेचा विषय ठरली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी देत जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंचा अडवला ताफा

News Desk

पंचायत समिती उपसभापतींचे दालन बनले पैशांचा अड्डा

Gauri Tilekar

शरद पवारांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही, बाळा नांदगावकरांचे मोठे वक्तव्य

News Desk