HW News Marathi
व्हिडीओ

Vijay Wadettiwar यांच्या 50 कोटींचा दावा ठोकण्याच्या इशाऱ्याला Gopichand Padalkar यांचं उत्तर ‘खुशाल दावा करा घाबरत नाही !

खोटे आरोप केल्याचा दावा करत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 50 कोटींचा दावा करण्याचा इशारा दिला होता. पडळकर यांनी मात्र, असल्या दाव्यांना आपण घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. माझ्यावर खुशाल 50 कोटींचा दावा करा. मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा आहेत, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला आहे. महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्काचे 125 कोटी रुपये यांना खर्च करता आले नाहीत. हे माझ्यावर 50 कोटींचा दावा करणार आहेत. खुशाल करा, मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे, असे खुले आवाहन पडळकर यांनी वडेट्टीवार यांना दिलं आहे.

#VijayWadettiwar #GopichandPadalkar #BJP #Congress #Maharashtra #MarathiNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raut यांच्या कारवाईनंतर पत्राचाळ मधील लोकांच्या प्रतिक्रिया

Seema Adhe

मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर Aslam Shaikh यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

ज्या दिवशी Shivsena, Congress सोबत जाईल..! – Sudhir Mungantiwar यांनी Balasaheb यांची आठवण करून दिली

News Desk