HW News Marathi
Uncategorized

‘खुशाल 50 कोटींचा दावा करा, मी घाबरत नाही’ – गोपीचंद पडळकर

मुंबई। खोटे आरोप केल्याचा दावा करत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 50 कोटींचा दावा करण्याचा इशारा दिला होता. पडळकर यांनी मात्र, असल्या दाव्यांना आपण घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. माझ्यावर खुशाल 50 कोटींचा दावा करा. मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा आहेत, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला आहे. महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्काचे 125 कोटी रुपये यांना खर्च करता आले नाहीत. हे माझ्यावर 50 कोटींचा दावा करणार आहेत. खुशाल करा, मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे, असे खुले आवाहन पडळकर यांनी वडेट्टीवार यांना दिलं आहे.

काय आहे प्रकरण ?

विजय वडेट्टीवार यांनी काल पडळकरांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टात जाईल. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी, असं वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवार यांचे आरोप

इयत्ता सातवीपर्यंत शिकलेला चंद्रपुरातील एक माणूस केंद्रात मंत्री होता. माझ्या आईने कष्ट करुन मला शिकवलं. संघर्षातून मी शिकलो. चळवळीतून घडलो. ओबीसी चळवळीला बदनाम करण्याचं काम पडळकर करतात. सुपारी घेऊन चळवळ संपवण्याचं काम ते करत आहेत. पडळकर खरंच ओबीसींसाठी काम करणार असेल तर त्यांनी सोबत यावं. चंद्रशेखर बावनकुळे कधीही पातळी सोडून बोलत नाहीत. ओबीसींचं नुकसान होणार नाही ही माझी आणि बावनकुळेंची भूमिका आहे, असं सांगतानाच भाजपमध्ये जाणार नाही असं कुलदैवताची शपथ घेऊन पडळकर भर सभेत बोलले होते. त्याचं काय झालं?, असा सवालही त्यांनी केला.

पडळकर यांचे आरोप

पडळकरांनी वडेट्टीवारांवर घणाघाती आरोप केले होते. वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री आहेत. तसेच दारुच्या व्यवसायात त्यांची भागिदारी आहे, असे आरोप पडळकर यांनी केले होते. त्यामुळे वडेट्टीवार प्रचंड संतापले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेसच्या तब्बल १२० नेत्यांचे राजीनामे…

News Desk

लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडण, पुढं जाऊन संसार कसा होणार ?

News Desk

शंभर रुपयांत दिवाळीनिमित्त शिधा संच, योजनेत गौडबंगाल – Ajit Pawar

News Desk