HW News Marathi
Uncategorized

कॉंग्रेसच्या तब्बल १२० नेत्यांचे राजीनामे…

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदी कायम रहावे आणि अध्यक्ष पदाचा राजीनामा माघारी घ्यावा यासाठी देशभरातील कॉंग्रेस नेत्यांनी राजीनामा देण्याचा अक्षरश: धडाका लावला आहे. शुक्रवारी काँग्रेस पक्षातील वेगवेगळ्या पदांवर काम करीत असलेल्या १२० हून अधिक जणांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये एक प्रकारचा भूकंप झाला असून लोकसभा निवडणुकीनंतर अपेक्षित असलेले मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

लोकसभा निवडणुकीत धक्कादायक आणि लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र हा राजीनामा कार्यकारिणीने एकमताने फेटाळला आहे. असे असले तरी राहुल गांधी हे अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी देखील राहुल गांधी यांना राजीनामा मागे घेण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला. तरी देखील राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. मात्र आता काँग्रेस पक्षातील वेगवेगळ्या पदांवर काम करीत असलेल्या नेत्यांनी राजीनामा देत राहुल गांधीच्या राजीनाम्याचा निषेध केला आहे.

तर आतापर्यंत अनेकांनी राजीनामे दिले असून पक्षाचे सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे प्रभारी दीपक बाबरिया, गोव्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोधनकर, तेलंगणाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष पून्नम प्रभाकर, दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष राजेश लिलोथिया, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बी व्ही श्रीनिवास यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाणे शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Manasi Devkar

मी पवार आणि राष्ट्रवादीसोबतचं…मोहिते-पाटलांचे घुमजाव !

News Desk

कोल्हापूरत अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या

News Desk