मुंबई। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा ही शब्द संजय राऊत खाली पडू देत नसल्याचे दिसते नाना पटोले यांनी अमरावतीमध्ये स्वबळाची भाषा केली त्यांनी स्थानिक आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केली आणि त्यावर सुरू झाला उत्तर प्रत्युत्तरांचा खेळ. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने कधीच स्वबळाची भाषा केली नाही असं म्हटलं. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी असं म्हटलंय की भविष्यात दोन मोठे पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली तर चमत्कार होईल, असं मत देखील राऊतांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना स्वबळावर लढण्या संदर्भातील इच्छा व्यक्त करणाऱ्या पक्षांबद्दल हे वक्तव्य राऊतांनी केलंय. पुढे बोलताना राऊत म्हणाले भाजपा आणि काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती का होऊ शकत नाही असा प्रश्न देखील उपस्थित केलाय. “महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी ला एकत्र लढावं लागेल आम्ही स्वबळावर लढू असं शिवसेना किंवा राष्ट्रवादी पैकी कोणीही म्हटलेले नाही. भविष्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रातील दोन पक्ष एकत्र आले आणि निवडणूक लढवली तर राज्यात चमत्कार होईल”, असं राऊत यावेळी म्हणाले.
आजच्या (१७ जून) सामनाच्या अग्रलेखातूनही शिवसेनेने काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सणसणीत उत्तर दिलं. ”मी पुन्हा येईन”, म्हणणारे ही आले नाहीत. नुसतं बोलून व बोलून काय होणार? असं सामनात म्हटले भाजपा काँग्रेस स्वबळावर लढत असतील तर महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष राहतात सगळेच स्वबळावर लढतील तर या दोन पक्षांना महाराष्ट्राचा विचार करून एकत्र लढावे लागेल त्याचे सूतोवाच उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी स्वतः केले, असा सज्जड इशारा शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून दिलाय.
महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळाच अजीर्ण झालेलं दिसतं
महाराष्ट्राच्या राजकारणात स्वबळाच अजीर्ण झालेलं दिसतं. जो उठतोय तो उद्याच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची भाषा करतोय. दुसरीकडे महाराष्ट्रात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्द्याने चांगलाच जोर धरला असताना या वातावरणात देखील काही लोकांना राजकारण, निवडणुका आणि स्वबळाचे वेध लागले आहे. महाराष्ट्राचे लोक राजकारणग्रस्त आहेत, पण ते इतके “ग्रस्त” असतील असे कधीच वाटले नव्हते”.
महाराष्ट्राच्या गादीवर काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवल्या शिवाय राहणार नाहीत
‘नाना पटोले हे (२०२४)साली महाराष्ट्राच्या गादीवर काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवल्या शिवाय राहणार नाहीत हे आता नक्की झाला आहे’ याबरोबरच महाविकास आघाडीतील काँग्रेस हा महत्त्वाचा घटक आहे, पण महाराष्ट्रात त्यांच्या पक्षा तिसऱ्या स्थानावर असल्याने स्वबळाची गर्जना करून नाना पटोले यांनी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण केलाय. असेदेखील शिवसेनेकडून सांगण्यात आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.