HW News Marathi
Covid-19

सेना भवनावर हल्ला करण्याचा भाजपचा डाव होता ! शिवसेनेचा गंभीर आरोप

मुंबई । अयोध्येतील राम मंदिर जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या कथित घोटाळ्यावरून शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये मुंबईतील दादर परिसरात चांगलीच जुंपली आहे. शिवसेना भवन परिसरात भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याने पोलिसांना देखील बळाचा वापर करणे भाग पडले. या संपूर्ण प्रकारानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया आल्या आहेत. ह्यातच शिवसेनेचे स्थानिक आमदार सरवणकर यांनी भाजपवर एक गंभीर आरोप केला आहे. “शिवसेना भवनावर हल्ला करण्याची भाजपाची योजना होती”, असे सदा सरवणकर ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले

सदा सरवणकर ह्यावेळी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, “भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते सेना भवनात एकत्र जमले होते. पण भाजपचे काही कार्यकर्ते विटा, दगड घेऊन सेना भवनावर हल्ला करण्यासाठी येत असल्याची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा शिवसैनिक प्रचंड चिडले आणि रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी ह्यावेळी भाजप कार्यकर्त्यांना रोखत असताना ही बाचाबाची झाली”, असे सांगत पुढे “शिवसेना भवनावर हल्ला करण्याची भाजपाची योजना होती”, असा गंभीर आरोप सदा सरवणकर यांनी केला आहे.

“आमच्या ३० वर्षांच्या युतीचा भाजपला विसर पडला आहे” अशी टीकाही यावेळी सदा सरवणकर यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप फेटाळून लावत उलट भाजप कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ करण्यात आल्याची माहिती महिला आघाडीने दिल्याचे सदा सरवणकर यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

News Desk

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ५७ लाखांवर पोहोचली, तर अमेरिकेत कोरोनामुळे १ लाख लोकांचा मृत्यू

News Desk

राज्यात पुन्हा एकदा १४ हजारांच्या पुढे बाधितांचा आकडा 

News Desk