HW News Marathi
देश / विदेश

संभाजीराजेंच्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी ! उद्या महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. हेच आरक्षण मिळवण्यासाठीच्या नव्या लढ्याचे पहिले पाऊल आज (१६ जून) कोल्हापूरमध्ये टाकण्यात आले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर आता राज्य सरकारने संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर उद्या (१७ जून) याबाबतची महत्त्वाची बैठक होणार आहे.

संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकानी आजच्या आंदोलनात ज्या मागण्या मांडल्या आहेत त्या मान्य करण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली आहे. त्यानुसार संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक यांची उद्या संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. ही उद्याची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार असून राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

मराठा आरक्षणासंबंधी उद्या होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमिती सदस्य आणि छत्रपती संभाजीराजे तसेच राज्य समन्वयक उपस्थित असणार आहेत. राज्य समन्वयक करण गायकर, राजेंद्र कोंढरे, रगुनाथ चित्रे पाटील, अंकुश कदम, विनोद साबळे, रमेश केरे आदी समन्वय बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची कामगिरी असमाधानकारक

News Desk

मोदी-पवार भेटीबाबत अफवा पसरवण्याचं काम, राष्ट्रवादीचा आरोप

News Desk

मथुरा-वृंदावन रंगले श्रीकृष्ण रंगी

Gauri Tilekar