HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजीराजेंसमोर जर काही भूमिका मांडायची असेल तर ती मी पुण्यात मांडेन!

कोल्हापूर | मराठा आरणक्षासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या मूक आंदोलनास सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात संभाजीराजेंच्या नेतृत्वात आज (१६ जून) सुरु असलेल्या मूक आंदोलनाला समर्थन देण्यासाठी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काळे कपडे आणि काळा मास्क परिधान करत यावेळी मराठा आरक्षणाची मागणी करत निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील पोहोचले होते. यावेळी त्यांनी संभाजीराजेंकडे निवेदन देत आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावं यासाठी तसंच आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत आधीच्या सरकारने दिलेल्या सवलती सुरु करण्यासाठी जे आंदोलन, प्रयत्न करतील त्या सर्वांसोबत भाजपा बिल्ला न लावता आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी जे आंदोलन सुरु केलं आहे त्यात आम्ही सर्व सहभागी झालो आहोत”.

“मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा असेल,” असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. “५ जुलैपासून विधानसभा आणि विधानपरिषद अधिवेशन आहे, त्याआधी राज्यातील लोकप्रतिनिधींना अशाप्रकारे बोलतं करणं उपयोगी राहील. यामुळे पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाला दिलेल्या सवलती तातडीने सुरु करा आणि आरक्षण मिळण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु करा असं सगळ्या लोकप्रतिनिधींनी म्हटलं पाहिजे,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मी या ठिकाणी कोल्हापूरचा नागरिक म्हणून आलो आहे सांगताना त्यामुळे संभाजीराजेंसमोर जर काही भूमिका मांडायची असेल तर ती मी पुण्यात मांडेन अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीड पोलीस दलासाठी वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते संपन्न!

News Desk

मुख्यमंत्री उद्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर, सांगलीचा दौरा करणार

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९वी ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने होणार

News Desk