HW News Marathi
महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९वी ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने होणार

कोल्हापूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९वी ऊस परिषद आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक परिषदा या ऑनलाईन घेतल्या जात आहेत. परिषदेच्या परवानगीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्‍हाधिकारी दौलत देसाई यांच्यात आज (३० ऑक्टोबर) चर्चा झाली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला. नव्या निर्णयानुसार ऊस परिषद आता २ नोव्हेंबरला जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर होण्याऐवजी आता कल्पवृक्ष गार्डन हॉल येथे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या २ नोव्हेंबरला जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषद घेण्याचे नियोजन केले होते. त्याबाबतची तयारीदेखील जवळपास पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या परिषदेसाठी परवानगी दिली नव्हती. त्यांनतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. या चर्चेनंतर परिषद ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा!

News Desk

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना; नितीन राऊत यांची घोषणा

Aprna

अनिल देशमुखांवरुन राणे पिता-पुत्रांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, केली राजीनाम्याची मागणी

swarit