HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझेला दुसरं समन्स जारी, अनिल देशमुखांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची करणार चौकशी

मुंबई | प्रसिध्द उद्योगपती अंबानी यांच्या अँटालिया घराबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस दालातून बडतर्फ अधिकारी सचिन वाझेला दुसरं समन्स जारी करण्यात आलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगानं हे समन्स जारी केलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. याप्रकरणी आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत वाझे यांच्या नावानं हे समन्स जारी करण्यात आलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप करत एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीच टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप यातनं केलेला आहे. याप्रकरणानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणी हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेची दखल घेत कोर्टानं सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. तर या आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशीही केली जात आहे.

मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. चांदीवाल यांनी 30 मे ला 5 जणांना समन्स बजावून या आरोपांच्या अनुषंगाने 11 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, सचिन वाझे यांनाही प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक होतं. मात्र वाझे हे सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यानं हे प्रतिज्ञापत्र सादर अद्याप सादर झालेलं नाही. त्यामुळे आयोगानं वाझेंच्या नावानं दुसरं समन्स बजावलं आहे. या प्रकरणात ज्यांच्यावर मुख्य आरोप आहेत, ते म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागणारा अर्ज यापूर्वीच सदर केलेला आहे.

सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात

मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. याप्रकरणी एनआयए सचिन वाझे यांची चौकशी करत आहे. तर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही एनआयए करत आहे. दरम्यान, या चौकशीत अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत काय नवी माहिती येणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वच्छता सुविधा, पंचायतींना अनुदानासाठी सुमारे ९ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी! – हसन मुश्रीफ

News Desk

देवेंद्र फडणवीस शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार

News Desk

‘शट अप या कुणाल’च्या दुसऱ्या सिझनला शिवसेना खासदार संजय राऊतांच्या मुलाखतीने होणार सुरुवात

News Desk