HW News Marathi
महाराष्ट्र

“राजकारण आपलं होतं मात्र जीव जनतेचा जातो”

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दर्शवली आहे, आणि त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीका देखील केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मंदिरं उघडण्याच्या आंदोलनांवरुन विरोधी पक्षांना सुनावलं आहे. ते म्हणाले, अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण करोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचं आहे. असं व्हायला नको, असं ते म्हणाले आहेत.

काही जणांना सगळंच उघडण्याची घाई झाली

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना विरोधकांना टोला लगावला आहे, ते म्हणाले, “काही जणांना सगळंच उघडण्याची घाई झाली आहे. पण त्या गोष्टी दीर्घकाळ बंद ठेवायला लागू नये म्हणूनच तर आम्ही ते हळूहळू, परिस्थितीचा आढावा घेऊन उघडत आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.आम्ही राजकारण्यांनीही करोना प्रतिबंधाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. जेव्हा आम्ही बाहेर जातो, जनतेत जातो, त्यावेळी आम्हीच जर नियमांचं पालन केलं नाही तर जनतेला काय सांगणार?, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचं असेल

राज ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारची कान उघडणी केली आहे. “ओबीसी राजकीय आरक्षण बाबत सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, निश्चित स्थगिती दिली पाहिजे. पण त्यामुळे हे काम पटकन होणार असेल तर याला स्थगिती मला मान्य आहे. निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचं असेल, त्यात काही काळंबेरं असेल तर तेही आपल्याला समजावून घ्यायला हवं. सगळ्या महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे पण सरकारचे चालू आहेत. मला असं वाटतं की पुढे असं नको व्हायला की ओबीसींचा विषय पुढे करुन सरकार काही गोष्टी साध्य करुन घेत आहे. पण ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या जनगणना वगैरे गोष्टी झाल्यानंतर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?

यावेळी त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्यावरही मनसेची भूमिका स्पष्ट केली. सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार. फक्त गणेशोत्सवाला नको. ही कोणती पद्धत?, असा सवाल करतानाच गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळं ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू, असं ते म्हणाले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. सावंत यांच्या पुस्तकांनी दिला जंगलभ्रमंतीचा सुंदर अनुभव! – उद्धव ठाकरे

Aprna

अजित पवारांच्या बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती, जरंडेश्वरमध्ये घोटाळा, सोमय्यांचा आरोप!

News Desk

पवार यांच्या बहिणीच्या ‘मुक्ता पब्लिकेशनवर’ प्राप्तिकर विभागाचा छापा

News Desk