HW News Marathi
महाराष्ट्र

“आम्ही समोरून कोथळा काढतो!”, संजय राऊतांचं प्रत्युत्तर

शिरूर | शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या बिधास्त वक्तव्यांसाठी जाणले जातात. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्हाला बाळासाहेबांनी हे घाणेरडं काम कधीच शिकवलं नाही, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर चढवला आहे.

आम्ही समोरून कोथळा काढतो

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती, त्यावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्ही शिवाजी महाराजांची औलाद आहोत. अफजल खानाचा कोथळा पुढून काढलेला आहे. जो कोणी असेल तो. शाहिस्ते खानाची बोटं समोरून तोडली आहेत. पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे घाणेरडं काम कधी शिकवलं नाही. काय असेल ते समोरून. पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा शिवसेनेची नाही, असं सांगतानाच पाठीत खंजीर आमच्या खुपसलेला आहे. शब्द आम्ही नाही फिरवला नाही. शब्द तुम्ही फिरवला आहे”, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.

ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांच सरकार

“राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे. शिवसेना दोन्ही पक्षांच्या (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) वर आहे. ही आपली पॉवर आहे”, असं म्हणत राऊतांनी सेनेची पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केलं आहे.

दुसरीकडे “शरद पवार आपले आहेत. अजित पवार देखील आपले आहेत. दिलीप वळसे गृहमंत्री असतील, मात्र शिवसेना सगळ्यांच्या वर आहे, असं म्हणत शिरुर लोकसभा मतदारसंघात जाऊन त्यांनी राष्ट्रवादीला डिवचलं. तसंच भाजपला अजूनही शिवसेनेची गरज लागते”, असं म्हणत शिवसेनेचं महत्त्व अधोरेकित केलं आहे.

जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल

संजय राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुलवलं तसंच शिवसेना नेत्यांच्या मनातली बात खुलेआम बोलून दाखवली. कार्यकर्त्यांनो कामाला लागा, असे आदेश देतानाच शिरुर आणि जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास वाटतो, असं राऊत म्हणाले. एकप्रकारे त्यांनी खा. कोल्हे आणि आमदार अतुलशेठ बेनके यांचा पराभूत करण्याचा मनसुबा बोलून दाखवला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात दहावीच्या परीक्षा होणार की नाही? मुंबई हायकोर्टात ३ जूनला पुढील सुनावणी होणार

News Desk

“त्यांना अक्कलेचे धडे मिळाले”, नाव न घेता नारायण राणेंचा अजित पवारांना टोला

Aprna

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या जबादारीतून भाजपने अंग काढून घेऊ नये | ठाकरे

swarit