HW News Marathi
महाराष्ट्र

“हिंमत असेल तर अफगाणिस्तानला जा”, अतुल भातखळकरांचा जावेद अख्तरांना आव्हान

मुंबई | प्रसिसद्ध कवी जावेद अख्तर हे सध्या चर्चेत आहेत. जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचं म्हणत त्याला समर्थन देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असे म्हटले आहे. त्यावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जा

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते म्हणाले, ““आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे आहेत हे जावेद अख्तर यांचं विधान म्हणजे केवळ बेशरमपणाचा कळस नसून समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे. जावेद अख्तर हे विसरत आहेत की, या हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जा आणि तालिबानवर टीका करा. त्यामुळे जावेद अख्तर आपलं विधान मागे घ्या. हिंदू समाजाची क्षमा मागा नाहीतर तुमच्या विरोधामध्ये बदनामीचा खटला केला जाईल,” असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

भारत कधीही तालिबानी देश बनू शकत नाही

“हा देश मुळात धर्मनिरपेक्ष देश आहे. इथली बहुसंख्य लोकसंख्या धर्मनिरपेक्ष आहे त्यामुळे तालिबान्यांच्या विचारसणीचा भारतीयांवर प्रभाव पडणार नाही. भारत कधीही तालिबानी देश बनू शकत नाही असं जावेद अख्तर यांनी एनडी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. “ज्याप्रमाणे तालिबानने अफगाणिस्तानमध्ये एका आठवड्यामध्ये उद्रेक करत सत्ता मिळवली ते पाहता हे पूर्व नियोजित असल्यासारखं वाटतंय. अमेरिका सरकार आणि तालिबान यांचा डाव असल्याचं हे वाटत आहे.” असे जावेद अख्तर म्हणाले आहेत.

तालिबान बनण्याची पूर्ण ड्रेस रिहर्सल

एनडीटीव्हीशी संभाषण करताना जावेद अख्तर, ज्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता ताब्यात घेण्यास नाखूष असलेल्या भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गावर टीका केली. ते म्हणाले की, राईट विंग जगात एक आहे. भारतातील अल्पसंख्यांकांच्या मॉब लिंचिंगच्या काही घटनांवर अख्तर म्हणाले, ‘पूर्ण तालिबान बनण्याची ही एक प्रकारची पूर्ण ड्रेस रिहर्सल आहे. ते तालिबानी युक्तीचा अवलंब करत आहेत. ते एकच लोक आहेत, फक्त नाव वेगळे आहे. भारतीय राज्यघटना त्यांचे ध्येय आणि त्यांच्यामध्ये येत आहे, परंतु जर संधी दिली तर ते ही सीमा ओलांडतील’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

ते रानटी आहेत पण ….

जावेद अख्तर पुढे म्हणाले, “‘मला वाटते जे आरएसएस, विहिंप, बजरंग दल यासारख्या संघटनांना समर्थन देतात, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तालिबान अर्थातच मध्ययुगीन मानसिकता आहेत, यात शंका नाही, ते रानटी आहेत पण तुम्ही समर्थन देत असलेल्यांपेक्षा ते वेगळे कुठे आहेत? त्यांची बाजू मजबूत होत आहे आणि ते त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहेत. त्यांची मानसिकता सारखीच आहे’.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक

News Desk

‘आत्ता पर्यंत कधीच राजकारण केले नाही, केले ते फक्त समाजकारण’, धनंजय मुंडे

News Desk

विनापरवाना मोटार सायकल रॅली काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार श्वेता महाले म्हणतात, “होय, आम्ही गुन्हेगार…”

Aprna