HW News Marathi
महाराष्ट्र

“अजित पवारांसोबत आम्ही सरकार स्थापन केलं, त्यावेळी ठाकरे सरकारने लावलेली ताकद आता कुठे गेली?”

सांगली | अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीचा उल्लेख अजूनही राजकीय वर्तृळात केला जात आहे. गेले काही दिवस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात याच विषयावरून वाद सुरु होता. आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी या विषयावरून सरकारला डिवचले आहे.

ठाकरे सरकारने जेवढी ताकद आम्ही अजित पवारांसोबत सरकार स्थापन केल्यानंतर कोर्टात लावली होती, तेवढी ताकद मराठा आरक्षणासाठी लावली नाही, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला. ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथे बोलत होते.

मराठा आरक्षणाकडे ठाकरे सरकारने दुर्लक्ष केलं. आम्ही अजित पवारांसोबत सरकार स्थापन केल्यानंतर न्यायालयात मोठी ताकद लावली तितकी सुद्धा इथे लावली नाही. अभ्यासासाठी तज्ज्ञांची गरज भासते, या विषयात चालढकल चालली आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 1 कोटी पत्र लिहिण्याचा उपक्रम घेतलाय, किती हा मूर्खपणा चाललाय?. शरद पवारांनी 1 कोटी पत्र उद्धव ठाकरेंना लिहायला सांगायला पाहिजेत, कदाचित पत्ता चुकला असावा, म्हणून मोदींना पत्र लिहिली जात आहेत, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाबाबतीत दिलेल्या सल्ल्यामुळे संभाजी भिडे अडचणीत

swarit

बीडच्या सोनेसांगवी सुर्डी गावात जागेच्या वादावरून अंत्यविधी रोखला

Aprna

पुनम महाजन आजकाल कुठे आहेत; संजय राऊतांचा सवाल

Aprna