HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीची उद्धव ठाकरेंना होती कल्पना?

मुंबई | प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील कालची (११ जून) बैठक राजकीय वर्तृळातील अनेकांच्या भूवय्या उंचावणारी होती. यांच्यातील मॅरेथॉन बैठकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही याचे पडसाद पाहण्यास मिळणार आहे. विशेष म्हणजे, या बैठकीबद्दल पूर्वकल्पनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही होती, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काही बदल होणार का अशी चर्चाही आता सुरु झाली आहे.

२०१९ ला जेव्हा शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या ३ पक्षांनी मिळून सत्ता स्थापन केली होती तेव्हाच महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदललं होतं. आता पुन्हा काही बदल होणार का शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर हे पाहणे येत्या काळात पाहाणे महत्वाचे असणार आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीत काय राजकीय चित्र असणार आहे. याबद्दल प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झास्याचं म्हटलं जात आहे. नेमकी चर्चा काय झाली याची माहिती अद्याप समोर आली नाही आहे.

प्रशांत किशोर यांच्यासोबत राज्यात रणनीती आखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने नियोजन करावे, काय समीकरण आखले जावे, मतदारसंघनिहाय कसे नियोजन असावे, याबद्दलही किशोर यांनी भाष्य केल्याचं म्हटलं जात आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी आषाढी वारीबद्दल देखील माहिती दिली आहे. यावेळी पत्रकारांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दल विचारलंत्या. तेव्हा उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. प्रशांत किशोर आणि पवारांची भेट राजकीय नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी अनेक नेते भेटत असतात. त्यानुसारच प्रशांत किशोर त्यांना भेटत आहेत, असं पवार म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योगी, महाराज राजकारणात आल्यावर देशाचे वाटोळे होते; प्रणिती शिंदे भाजपवर टीकास्त्र

Aprna

‘ऐरे गैरे नथु खैरे’, जयदत्त क्षीरसागरांची पुतणे संदीप क्षीरसागरांवर टीका

Aprna

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित किंवा शून्य गुण 

News Desk