HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजता जनतेशी संवाद साधणार

नवी दिल्ली | देशात कोरोना संकटाशी गेल्या वर्षीपासून आपला देश लढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला ३ लाखांच्या पुढेही रुग्ण संख्या गेली आहेत. मात्र, आता देशातील ही कोरोना संख्या आटोक्यात आली आहे. कोरोना लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. या सगळ्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (७ जून) संध्याकाळी ५ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी नेमकी ते काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. कोरोना रुग्ण संख्या, कोरोना लसीकरण या सगळ्या गोष्टींवर मोदी भाष्य करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

देशातील कोरोना परिस्थिती काय आहे?

देशातला कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत १,००,६३६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.तर २,४२७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. देशात प्रथमच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीन हजारांहून खाली आली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आहे. १.७४,३३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १४ लाख एक हजार ६०९ वर पोहोचली असून करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या दोन कोटी ७१ लाख ५९ हजार १८० झाली आहे.

देशातली लसीकरण मोहीम सध्या जोमात सुरु असल्याचं दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १३ लाख ९० हजार ९१६ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी १३ लाख ११ हजार १६१ नागरिकांनी पहिला तर ७९ हजार ७५५ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या २३ कोटी २७ लाख ८६ हजार ४८२ वर पोहोचली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे शहरात ५ ऑगस्टपासून हॉटेल, मॉल सुरू होणार, जाणून घ्या नियम !

News Desk

राज्यात सध्या लॉकडाऊनलावण्याचा कोणताही सरकारचा निर्णय नाही!

News Desk

दिलासादायक! मुंबईत नव्या कोरोनाबाधितांची आकडेवारी घट

Aprna