HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडीत पुन्हा बिघाडी? कॉंग्रसे नेते बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या, मंत्र्याच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटी घेण्याचं मंत्र्यांचं सत्र सुरुच आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, खासदार संभाजीराजेंनी गेल्या आठवड्याभरात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. आता महाविकास आघाडीतील काहीसे मतभेद आणि विसंवाद पाहता आज काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पवारांची भेट घेतली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी, विसंवाद सुरु आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची परस्पर घोषणा केल्याने त्यात अजून भर पडली होती. यावर वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीचे नेते जर दुसऱ्यांच्या अखत्यारीतील, खात्यांचे निर्णय मीडियासमोर जाहीर करत असतील, तर मी काय चुकीचे केले, अशी नाराजी व्यक्त केली होती. यावरून तिन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र दिसत होते.

याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या निवासस्थानी जात काँग्रेस नेते थोरात यांनी राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. यामध्ये काय बोलणे झाले, याची माहिती देण्यात आली नाही. परंतू ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले गेले. शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर अनेक मंत्र्यांनी, नेत्यांनी शरद पवारांची भेटून किंवा फोन करत तब्येतीची विचारपूस केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर ! बेस्टची भाडेवाढ नाही

News Desk

Live Update : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न, २८२ आमदारांनी घेतली शपथ

News Desk

एक तप सत्तेत राहण्याचा मोदी सरकारचा मानस

News Desk