HW News Marathi
Covid-19

ठाणे, नवी मुंबई आणि वसईत आजपासून काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या…

ठाणे | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. राज्य सरकारकडून अनलॉकसाठी ५ टप्पे ठरवण्यात आले आहेत. याबाबतची नवी नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. या पाच टप्प्यांपैकी ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिका आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्र दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आलं आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, भिवंडी महापालिका, उल्हासनगर महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड नगर पंचायत आणि संपूर्ण ग्रामीण क्षेत्र हे तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आले आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये नव्या नियमावलीनुसार आजपासून (७ जून) काय सुरु, काय बंद असणार जाणून घ्या..

ठाणे शहर आणि नवी मुंबई शहरात नेमकं काय सुरु काय बंद राहील?

  • दुकाने नियमित वेळेप्रमाणे सुरु राहणार
  • मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रिन, नाट्य गृह 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार
  • रेस्टॉरंट आणि हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार
  • लोकल ट्रेन – मेडिकल आणि अत्यावश्यक सेवेसाठी फक्त मुभा
  • सार्वजनिक स्थळ आणि उद्याने सामान्य लोकांसाठी खुली असणार
  • शासकीय आणि खाजगी कार्यालय 100 टक्के क्षमतेने सुरु राहणार
  • इंडोर गेम ( खेळ) – सकाळी 5 ते 9 आणि संद्याकाळी 5 ते 9-आउट डोअर गेम – हे पूर्ण दिवस सुरु करण्यासाठी मुभा
  • शूटिंग – रेगुलर– गॅदरिंग, सभा, बैठका आणि सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची मुभा
  • लग्न समारंभ 50 टक्के क्षमता, जास्तीत जास्त 100 लोकांना परवानगी
  • अंतयात्रा नेहमीप्रमाणे काढण्याची मुभा– सर्व साधारण शासकीय सभा आणि बैठका 50 टक्के क्षमतेने आयोजित करण्याची मुभा
  • बांधकाम व्यवसायासाठी (कंस्ट्रक्शन) दिवसभर मुभा
  • शेती आणि त्याच्यावर अवलंबून उद्योगासाठी नेहमीप्रमाणे मुभा
  • ई कॉमर्स आणि सर्व्हिसेस नेहमी प्रमाणे मुभा– संचारबंदी उठवली आहे, जमवाबंदी पूर्वीसारखी असणार
  • जिम, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, वेलनेस सेंटर
  • 50 टक्के क्षमतेने सुरु, मात्र नोंदणी करण्याची सक्ती– सार्वजनिक वाहतूक
  • 100 टक्के क्षमतेने मात्र उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही
  • कार्को मॅनेज मॅनेजमेंट – 3 जण ( ड्राइवर, हेल्पर, क्लिनर ) यांना परवानगी
  • अंतर जिल्हा प्रवासासाठी मुभा, मात्र लेव्हल 5 मध्ये जाण्यासाठी ई पास आवश्यक असणार
  • बाहेर देशात निर्यात करणाऱ्या उद्योग कंपनींना पूर्वी सारखी काम करण्याची मुभा असणार

वसई विरारसह पालघर जिल्ह्यात काय सुरू राहणार?

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि आस्थापनं सोमवार ते रविवार सकाळी 2 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहतील
  • अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील
  • रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
  • 4 नंतर पार्सल सेवा सुरू राहील आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा सुरू राहील.
  • लोकल ट्रेनसाठी मुंबई महापालिकेने लागू केलेले आदेश लागू राहतील
  • सार्वजनिक उधाने, मैदान, ,चालणे, सायकलिंग सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील
  • खाजगी आस्थापना दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील
  • कार्यालयीन उपस्थिती 50 टक्के क्षमतेने सुरू राहातील
  • खेळ सोमवार ते रविवार सकाळी 5 ते सकाळी 9 आणि सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहतील
  • शुटिंग चित्रीकरण बबलच्या आतमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील
  • सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील
  • विवाह समारंभास 50 व्यक्ती तर अंत्यविधीसाठी 20 माणसांची उपस्थितीची मर्यादा
  • बैठका, निवडणुका, वार्षिक सर्वसाधारण बैठका 50 टक्के उपस्थिती
  • बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या मजुरांवर बांधकाम करता येईल, त्यांना 4 वाजता सुट्टी देणे बंधनकारक आहे
  • कृषीविषयक सर्व कामे 4 वाजेपर्यंत सुरू राहतीलई कॉमर्स नियमित सुरू राहतील
  • जिम, सलून , ब्युटीपार्लर, स्पा, सोमवार ते रविवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील
  • गिऱ्हाईकांना वेळ ठरवूनच बोलवावे लागेलसार्वजनिक वाहतून 100 टक्के आसन क्षमतेने चालू राहणार
  • अंतर जिल्हा प्रवास नियमित सुरू राहतील, परंतु निर्बंध स्तर लेवल 5 मधील जिल्ह्यामध्ये जाण्याकरिता किंवा जिल्ह्यामधून
  • वाहतूक करताना थांबणार असतील तर ई पास आवश्यक राहील

काय बंद राहणार?

  • अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे बंद राहतील
  • मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद राहतील
  • शुटिंग चित्रीकरण करताना बबलच्या बाहेर फिरता येणार नाही
  • वसई विरार महापालिका क्षेत्रात सायंकाळी 5 पर्यंत जमावबंदी, तर 5 नंतर संचारबंदी राहणार आहे
  • सार्वजनिक वाहतून 100 टक्के आसन क्षमतेने होईल, पण प्रवाशांना उभं राहून प्रवास करता येणार नाही
  • जिम, सलून , ब्युटीपार्लर, स्पामध्ये वातानुकूलतेचा वापर करता येणार नाही
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : मुंबईत प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या रुग्णाचा मृत्यू

News Desk

सांगली जिल्ह्यात रिकव्हरी रेट वाढतोय – जयंत पाटील

News Desk

ब्रिटन आणि भारत यांच्यातील हवाई वाहतूक बंदी ७ जानेवारीपर्यंत कायम

News Desk