HW News Marathi
Covid-19

मुंबईत आजपासून काय सुरू काय बंद? जाणून घ्या…

मुंबई | राज्यातील कोरोना रूग्ण संख्या आता हळूहळू आटोक्यात येऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात ५ टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (६ जून) महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि ५ लेव्हल्स ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या असे स्पष्ट निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबईत आजपासून काय सूरु आणि काय बंद राहणार जाणून घेऊया…

काय सुरू राहणार?

  • अत्यावश्यक सेवेत असलेली दुकाने संपुर्ण आठवडाभर ७ ते ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.
  • अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील
  • रेस्टोरंट सोमवार ते शुक्रवारमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु रराहतील त्यानंतर पार्सल सेवा सुरु राहतील
  • लोकल ट्रेन वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु राहतील
  • सार्वजनिक ठिकाणं, मैदानं, वॉकिंग आणि साकलिंगसाठी सकाळी ५ ते सकाळी ९ ही वेळ देण्यात आली आहे
  • मैदानी खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ९ ही वेळ असणार आहे

  • खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ पर्यंत सुरु राहतील तर सरकारी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती आणि खाजगी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीत कामकाज सुरु ठेवावं लागेल
  • चित्रीकरणासाठी बायोबबल बंधनकारक असणार असून संध्याकाळी ५ नंतर चित्रीकरणाला परवानगी नाही
  • सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन यासारख्या कार्यक्रमांना संध्याकाळी ४ पर्यंत ५० टक्के लोकांच्या उपस्थितीत परवानगी असणार आहे.
  • लग्न समारंभ ५० लोकं तर अंत्यविधीसाठी २० लोकं उपस्थिती राहू शकतात
  • सभा आणि निवडणूंकांना ५० टक्क्यांचे मर्यादा असणार आहे
  • तर बांधकाम साईटवर जे कामगार तिथे उपस्थित आहेत तीचं लोकं साईटवर काम करु शकतील आणि हे काम ४ वाजेपर्यंतच करु शकतील
  • ई कॉमर्स काम पुर्ण सुरु राहणार
  • कृषी क्षेत्राचं काम संध्याकाळी ४ पर्यंत सुरु राहणार
  • सार्वजनिक वाहतूक १०० टक्क्यांनी सुरु राहणार
  • जमावबंदी संध्याकाळी ५ पर्यंत आणि संचारबंदी ५ नंतर लागू असणार आहे

काय बंद राहणार?

मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन शिएटर आणि नाट्यगृह बंद राहतील

शाळा, कॉलेज बंद राहणार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! राज्यात आज २० हजारांहून अधिक जण ‘कोरोनामुक्त’

News Desk

खासदार अमोल कोल्हेंची कोरोना चाचणी निगेटिव्ह

News Desk

मी जेव्हा पुन्हा ठाण्यात येईन तेव्हा ठाणे कोरोनामुक्त झालेले मला नक्कीच आवडेल – मुख्यमंत्री

News Desk