HW News Marathi
Covid-19

कोल्हापूरमध्ये आजपासून काय सूरु आणि काय बंद असणार? जाणून घ्या…

कोल्हापूर | राज्य शासनाने मिशन बिगीन अगेन अंतर्गत जिल्ह्यांची पाच गटात वर्गवारी केली आहे. त्यानुसार प्रत्येक गटासाठी निर्बंध उठवण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्याअंर्तगत पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड संख्या या निकशावर कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश चौथ्या गटात झाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या निर्बंधांमध्ये आजपासून (७ जून) काही प्रमाणात शिथिलता मिळणार आहे.

काय सुरु आणि काय बंद राहणार?

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू
  • सुरु असलेल्या उद्योगांसह तिथे काम करणाऱ्या कामगारांना राहण्याची व्यवस्था आहे अशा जागी ५० टक्के क्षमतेने काम सुरु राहणार
  • हॉटेल रेस्टॉरंटमधून होम डिलिवरीसह पार्सल सुविधाही सुरू राहतील.
  • सरकारी, खासगी कार्यालयात 25 टक्के उपस्थिती
  • सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमावरील बंदी कायम
  • लग्न समारंभाला 25 लोकांची उपस्थिती
  • अंत्ययात्रेला केवळ 20 लोकांना परवानगी
  • बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार
  • शेतीची कामे दुपारी 4 वाजेपर्यंतच
  • ई-कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी
  • संचारबंदी लागू राहणार • सलून, जिम 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार • बस सेवाही 50 टक्के क्षमतेने
  • डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी -माहिती तंत्रज्ञान महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवाशी संबंधित. शासकीय आणि खाजगी सुरक्षा विषयक सेवा.
  • विद्युत आणि गॅस पुरवठा विषयक सेवा.
  • ATM’s.
  • पोस्टल सेवा.
  • बंदरे आणि त्या अनुषांगीक सेवा. कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर(लस/औषधी/जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)
  • अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पँकेजिंग मटेरीयल यांचे उत्पादन करणारे उद्योग.
  • पावसाळी हंगामासाठी आवश्यक वैयक्तीक व संस्थांसाठी वस्तुचे उत्पादन करणारे घटक सुरु राहतील.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन

News Desk

जागतिक बँकेकडून भारताला १ अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर

News Desk

लॉकडाऊनचे मुख्यमंत्र्यांचे संकेत मात्र भाजपचा विरोध

News Desk