मुंबई । छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348 वा राज्याभिषेक सोहळा खासदार संभाजीराजे छत्रपतींसह अन्य २२ जणांच्या उपस्थितीत रायगडावर संपन्न झाला आहे. यावेळी, संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजे यांनी आज (6 जून) मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. “छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच 16 जूनपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत”, अशी घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी काहीच दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांसह राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांची भेट घेतली होती. तसेच 6 जूनपर्यंत यावर तोडगा न निघाल्यास रायगडावरून राज्याभिषेक दिनीच आपण आंदोलनाची घोषणा करून असेही संभाजीराजे यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे, आज अखेर संभाजीराजेंनी ही आंदोलनाची घोषणा केली आहे. या घोषणेचे राज्यभरात येत्या काळात काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
संभाजीराजे छत्रपती यावेळी बोलताना म्हणाले की, “मी राजकारणी नाही, मी राजकारण करत नाही. पण मधल्या काळात काही लोक माझ्यावर नाराज झाले. पण मी माझ्या समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. काही शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का?कुठे चुकलो असेन तर मी दिलगिर आहे. आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ”, असेही संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.