HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस जाणार शरद पवारांच्या भेटीला…नेमकं कारण काय ?

मुंबई | मुंबईत स्फोटकांनी गाडी सापडल्याचे प्रकरण, सचिन वाझेंना झालेली अटक, महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा या घडामोडींनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हे सगळं सुरु असतानाच आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, आजच शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस लवकरच ही भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास्थानी जाऊन फडणवीस त्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, ही राजकीय भेट नसून शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात चौकशी करण्यासाठी फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे मागील आठवड्यात मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला असून सिल्वर ओक या निवास्थानी विश्रांती घेत आहेत. दरम्यान, काल (६ एप्रिल) भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सिलव्हर ओकवर जाऊन भेट घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात एकूण चार टप्प्याच्या निवडणुकीत ६०.६८ टक्के मतदान

News Desk

शिवसेना-भाजपची खरंच युती होणार का? संजय राऊतांनी दिलं ‘हे’ उत्तर!

News Desk

त्या भगिनीला काय सांगू! इथे सर्वच गोष्टी विकण्याचा कार्यक्रम सुरू आहे – जयंत पाटील

News Desk