HW News Marathi
महाराष्ट्र

“नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण का दिले नाही?”, अजित पवारांचा परखड सवाल

पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (४ जून) मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण का नाही दिलं. पवार साहेब समोर आलं की वाकून नमस्कार करायचा आणि नंतर असं बोलायचं, असं ते म्हणाले.

…त्यामुळं त्यांच्याबद्दल न बोललेलच बरं

चंद्रकांत पाटलांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत दादांनी सांगितलंय की ते कसे आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दल न बोललेलच बरं. मी तर सारखा झोपेतून जागा होतो आणि चॅनल लावतो. हे चॅनल ते चॅनल आणि बघतो. पडलं पडलं पडलं असं ऐकायला मिळतं असं असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला आहे. तर फडणवीसांवर बोलताना म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना सांगणार आहे की आपण फडणवीसांची शिकवणी लावू. मी पण त्या शिकवणीला जाईन, असं अजित पवार म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीने एकोप्याने राहायचं ठरवलं आहे

उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यानंतर दुसऱ्या फळीतील आम्ही देखील एकोप्याने राहत आहोत. पण हा एकोपा खालपर्यंत पोहोचायला वेळ लागेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. जिथं राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना किंवा जिथं शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस अशी लढत झाली तिथं एकत्र बसून प्रश्न सोडवावे लागतील.

तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ

रायगडमध्ये आम्ही मार्ग काढला. आमच्याकडून जयंत पाटील आणि मी आणि त्यांच्याकडून उद्वव ठाकरे मार्ग काढतील, असंही अजित पवार म्हणाले. महापालिका निवडणुकीमधे प्रभाग रचना कशी असेल याबाबत आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ, असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अतिवृष्टीसह पुरबाधित व्यावसायिकांना अवघ्या ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा!

News Desk

Bhima Koregaon Case : गंभीर गुन्हे दाखल असल्याने आरोपींना जामीन देऊ नका !

News Desk

ऊसतोड कामगारांच्या मुलांबाबतच्या पोस्टला पंकजा मुंडेंचं उत्तर…..!

News Desk