HW News Marathi
महाराष्ट्र

शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये साताऱ्यात जोरदार सशस्त्र मारामारी!

सातारा | साताऱ्यामध्ये दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारीचे गोष्ट समोर अली आहे. साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यातील वैर संपूर्ण राज्याला माहित आहे. मात्र शहरात पहिल्यांदाच त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या सशस्त्र मारामारीमुळे शहरात खळबळ माजली.

बुधवारी संध्याकाळी उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लावली आणि त्यातून भडका उडाला असे समजते. दरम्यान, दोन्ही गटांच्या तुफान हाणामारीतून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकं काय झालं?

साताऱ्यामध्ये रात्री सव्वा अकराच्या दरम्यान या दोन गटात मारामारी झाली आहे. याच ठिकाणी बाळासाहेब खंदारे यांचे कार्यालय आहे. कार्यालयासमोरच गाडी लावल्याने खंदारे आणि भोसले गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. दोन गटांमध्ये उडालेल्या या धुमश्चक्रीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या मारामारीत शस्त्रांचा वापर झाल्याचे चर्चा आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील १८२ जणांची यादी, त्यापैकी १०६ पुण्यात आढळले !

swarit

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कारवाई करा

News Desk

राज्याचे अर्थसंकलपीय अधिवेशन १ मार्चपासून सुरू होणार

News Desk