HW News Marathi
महाराष्ट्र

“एकमेकांच्या मुळावर येणार असाल तर ते सहन होणार नाही, संजय राऊतांचा इशारा

पुणे | शिवसेना खासदार संजय राऊत आज (५जून) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी खेड येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या वादाबद्दल भाष्य केले आहे. खेडमध्ये शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरले आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांच्या गटातील वाद पक्षश्रेष्ठींकडे गेला आहे.

यावरच काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचा पालकमंत्री अजित पवार यांना आपल्या आमदाराला आवरण्याचा इशारा दिला होता. यावरच आज (५ जून) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पुन्हा एकदा अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती केली आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, “खेडसारख्या घटनांमुळे कटुता निर्माण होते. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. सत्ता असो किंवा नसो शिवसेना पक्ष आम्हाला महत्वाचा आहे. तसेच, जर आमच्या मुळावर कोणी येणार असेल तर हे होणार नाही. आणि अन्याय सहन न करण्याची भूमिका की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे. त्यामुळे एकमेकांचे पाय कापू नका”, असंही यावेळी राऊत म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे 8 सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून 14 पैकी 10 सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. परंतु त्यातच सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केले आहे. तर, ६ सदस्यांना धमकावून आणि पैशाची मस्ती दाखवून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी आपल्या बाजूने केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपने निवडणुकीपूर्वीच आत्मविश्वास गमावला, उमेदवारीच्या गोंधळावरून मुंडेंचा विरोधकांना टोला

News Desk

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंना जामीन मंजूर

News Desk

संजय राऊत आणि निवडणूकीचा काहीही संबंध नाही, निलेश राणेंचा प्रहार

News Desk