मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन तसंच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. याचप्रकरणी परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. एनआयएकडून त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाशी संबंधित व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला होता. या प्रकरणाचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) सुरू होता.
Mumbai: Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh arrives at the NIA office, in connection with the Antilia bomb scare case pic.twitter.com/qrUdulVzAj
— ANI (@ANI) April 7, 2021
मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला मुंब्रा खाडी, रेतीबंदर येथे सापडला. आदल्या रात्री ते कांदिवलीतील तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी घोडबंदरला जातो, असे सांगून घराबाहेर पडले आणि बेपत्ता झाले होते. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला सापडलेली स्कॉर्पिओ कार तीन वर्षांपासून मनसुख यांच्या ताब्यात होती. या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि अंबानी कुटुंबाला धमकी देणारे पत्र आढळले. पोलीस यंत्रणांनी जेव्हा मनसुख यांच्याकडे जाब विचारला तेव्हा ही कार १७ फेब्रुवारीला चोरी झाली, त्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात दिली होती असं सांगितलं होतं.
मात्र मनसुख आणि अटक आरोपी सचिन वाझे यांच्यात मैत्री होती. मनसुख यांची स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती तर ती वाझे यांच्या ताब्यात होती, वाझे यांनीच ही गाडी अंबानी यांच्या निवासस्थानाजवळी उभी केली, असा संशय एनआयएला आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएने गुन्हे शाखेचे सात अधिकारी, अंमलदारांची चौकशी केली आहे. त्यात एक सहायक आयुक्त, एक निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि तीन अमलदारांचा समावेश आहे.
अनिल देशमुखांनी गृहमंत्री पदाचा दिला राजीनामा
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी गोळा करायला सांगितल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. दरम्यान, आज (५ एप्रिल) या प्रकरणावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर असून हे प्रकरण CBI कडे वर्ग करण्यात आले आहे.
अनिल देशमुख यांनी त्यांचा राजीनामा ट्विट करत मुख्यमंत्र्यांना त्यांनी लिहिलेलं पत्रही त्यांनी जोडले आहे. यात अनिल देशमुख यांनी असं लिहिलं आहे की, ‘मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये ५ एप्रिल २०२१ रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्या अनुषंगाने मी गृह पदावर राहणे मला नैतिक दृष्ट्या योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वत:हून या पदापासून राहण्याचा निर्णय घेत आहे’, असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 5, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.