HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठीच्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्यांचा समावेश, नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

बीड | मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सरकारला तर धक्का बसलास पण मराठा समाजाला मोठी हाती बसली. मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीत मराठा द्वेषी सदस्यांचा समावेश आहे, असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला आहे. नरेंद्र पाटील आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज (४ जून) बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. उद्या शनिवारी बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चाची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नरेंद्र पाटील यांनी भोसले समितीत मराठा द्वेषी सदस्य असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

…म्हणून वडिलांनी आत्महत्या केली

माझे वडील काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार होते. त्यांनी आर्थिक निकषावर मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर काहीच निर्णय घेतला गेला नाही. मराठा आरक्षणासाठी 1982 साली काँग्रेसने कोणतीच समिती स्थापन केली नाही आणि म्हणून वडिलांनी आत्महत्या केली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

फडणवीसांमुळेच 25 हजार उद्योजक निर्माण झाले

शिवसेना आणि भाजपने मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. तर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी योजना सुरू केल्या. फडणवीसांनीच शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली. फडणवीसांमुळेच 25 हजार मराठा उद्योजक निर्माण झाले, असा दावा त्यांनी केला आहे.

कोरोना असला तरी मोर्चा काढणारच

मराठा समाजासाठी विनायक मेटे, खासदार संभाजी छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे चांगलं काम करत आहेत. काही लोक सत्तेसाठी लाचारी करत आहेत. त्यांनी लाचारी सोडावी आणि मराठा आरक्षणासाठी एकत्र यावे, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच 52 मोर्चांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या आम्ही मोर्चा काढूच. कोरोना असला तरी आम्ही मोर्चा काढणारच. चांगल्या कामाला सहकार्य करण्याची काँग्रेसची लायकी नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पिंजऱ्यातून हात धुवा आणि अंतर ठेवा या पलीकडे मुख्यमंत्र्यांना काही सांगता येत नाही – नारायण राणे

News Desk

‘जो संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करेल, अशा गोंधळी खासदारांना…’ रामदास आठवले

News Desk

महाडमध्ये दरड कोसळून ३० हून अधिक घरं ढिगाऱ्याखाली, नागरिक अजूनही बेपत्ता

News Desk