HW News Marathi
महाराष्ट्र

“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी वसुली करण्यास सांगितलं असं अनिल देशमुखांनी थेट सांगावं”

मुंबई | सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनिल देशमुख व राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे अनिल देशमुख यांची तर कपिल सिब्बल हे राज्य सरकारची बाजू मांडणार असल्याचं समजत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत उपलब्ध झाल्यावर देशमुख हे तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ वकील सिंघवी यांच्याशी चर्चा देखील केली. दरम्यान या सर्व घडामोडींवरुन भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी टीका केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

“जे सचिन वाझेंनी केलं तेच परमबीर सिंह यांनी केलं, अनिल देशमुख यांनीदेखील तेच करावं. सचिन वाझेंनी सगळ्यांची नावं दिलेली दिसत आहेत, परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख सांगत होते अशी माहिती दिली असून तसंच अनिल देशमुख यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे माझी वसूली चालू होती असं स्पष्ट सांगावं. म्हणजे विषय तिथेच संपेल,” असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

“माझ्याकडे अनेक कागदपत्रं आहेत ज्यामधून हे फंड कलेक्शन वरपर्यंत जात होतं आणि त्याचे अनेक लाभार्थी असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून अनिल परब हे हॅण्डलर होते. शरद पवारांनी अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न का केला? कारण स्पष्ट आहे…की लाभार्थी. माझ्या माहितीप्रमाणे आणखी चार लाभार्थी आहेत. संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले…याशिवाय आणखी चार लाभार्थींची नावं बाहेर येणार,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, “अजून तर सीबीआयने तपास सुरु केलेला नाही. एनआयए, सीबीआय आणि यानंतर ईडीपासून इतर सगळ्या यंत्रणा जेव्हा कामाला लागणार तेव्हा ठाकरे सरकारचे अर्धे डझन आऊट होतील”.

काय होता परमबीर सिंगाचा आरोप?

मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. असा आरोप करीत राज्याच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडवून दिली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा धक्कादायक आरोप त्यांनी केला होता. ‘हे’ देशानं पहिल्यांदाच पाहिलं आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३७६ एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन राज्य सरकारची कारवाई

News Desk

राष्ट्रवादीचा ‘हा’ मोठा नेता मोदींच्या कानमंत्रावर चालतो ,राज्यपालांचा गौप्यस्फोट!

News Desk

मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे!

News Desk