मुंबई । राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी थोड्याच वेळापूर्वी राज्यात ५ टप्प्यांत अनलॉकची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, विजय
वडेट्टीवारांच्या या घोषणेनंतर आता राज्य सरकारकडून तितडीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. “राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत”, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहेत.
“कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत”, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहेत.
राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. #BreakTheChain अंतर्गत काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. pic.twitter.com/ZiXbhlMgAK
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 3, 2021
निर्णय अद्याप विचाराधीन !
ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन ५ टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी दर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे जाहीर करण्यात येतील.
अधिकृत निर्णय नंतर कळवला जाईल !
राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, “राज्यात अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव अद्याप विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन त्याबाबतच्या अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते पुढे शासननिर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात येईल.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.